Advertisement

३० वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह

प्रजापत्र | Saturday, 30/09/2023
बातमी शेअर करा

केज - तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असून सदरील मृत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास सुरू आहे.

           चंद्रकांत नरहरी बरकसे (वय-३०) रा.गोटेगाव ता.केज असे मृत युवकाचे नाव आहे. सदरील युवक हा तहसील कार्यालय परिसरातील एका हॉटेलवर मजुरी काम करून केज शहरात राहत होता. मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चहाच्या एका गाड्यावर चंद्रकांत बरकसे या युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.
               सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. तर १०८ या नंबर वर कॉल करून रुग्णवाहिकेस पाचरण केले. रुग्णवाहिकेचे पायलट संतोष वळसे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदरील मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास केज पोलीस हे करत आहेत.

Advertisement

Advertisement