Advertisement

माऊली मिल्कवर अन्न प्रशासनाची धाड

प्रजापत्र | Wednesday, 13/09/2023
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात अन्न प्रशासनाने खाद्यपदार्थ तपासणी मोहीम चांगलीच हाती घेतली असून आष्टी पाठोपाठ आता बीडमध्ये भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. बार्शी नाका परिसरातील माऊली मिल्क प्रॉडक्टवर अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी आज (दि.१३) ही कारवाई केली.

      गणेश उत्सव तोंडावर आला असून बाजारात भेसळयुक्त पदार्थांची विक्री मोठया प्रमाणावर सुरु असते. त्याअनुषंगाने अन्न प्रशासनाच्या वतीने तपासणी आणि कारवाईची मोहीम हाती घेतली असून आज बीडच्या बार्शी रोडवरील माऊली मिल्क प्रॉडक्टची झाडाझाडती घेण्यात आली. यावेळी १४० लिटर गाय दूध व १५० लिटर म्हशीचे भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. याठिकाणी मोठया प्रमाणावर भेसळ होतं असल्याची माहिती अन्न प्रशासनाला मिळाल्यानंतर ही कारवाई आज करण्यात आली आहे. यात ११ हजारांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला असून ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी,सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे,अन्न व औषध प्रशासनचे नमुना सहायक उमेश कांबळे व दूध संकलन परियवेक्षक दत्तात्रेय थोरात, संतोष मोराळे यांनी केली. 

Advertisement

Advertisement