Advertisement

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली

प्रजापत्र | Tuesday, 12/09/2023
बातमी शेअर करा

सनी देओल सध्या गदर 2 मुळे चर्चेत आहे. गदर 2 मुळे सनी देओल सध्या यशाची मजा घेतोय. अशातच सनी देओल गदर 2 चं यश बाजूला ठेऊन अमेरिकेत रवाना झालाय. धर्मेंद्रची प्रकृती खालावली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्यने सनीने गदर 2 चे प्रमोशन थांबवले असुन धर्मेंद्र यांच्या उपचारासाठी तो अमेरिकेला गेला आहे.

 

धर्मेंद्र आजारी असल्याची चर्चा

इंडिया टुडेच्या मते, सनी देओल सध्या गदर 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. सनी देओल सध्या गदर 2 चं यश साजरं केलंय. पण आता त्याने प्रमोशनमधून ब्रेक घेतला आहे आणि तो त्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह यूएसएला रवाना झाला आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने सनीने हा निर्णय घेतलाय. पण ही चर्चा अफवा असल्याचं निष्पन्न झालंय

 

धर्मेंद्र आजारी नाहीत तर हे आहे कारण...

तथापि, देओल कुटुंबाच्या जवळच्या सोर्सने ETimes ला सांगितले की, धर्मेंद्र आजारी आहेत हे वृत्त खरे नसून ही फॅमिली सुट्टीसाठी देओल कुटुंब एकत्र आल्याचं समजचंय. सुत्रांच्या म्हणण्यानुसार सनीने त्याच्या दोन बहिणी अजिता आणि विजयता यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना नेले आहे. या सुट्टीचे योग्य वेळी नियोजन करण्यात आले आहे. कारण 1 सप्टेंबरला सनीची आई प्रकाश कौर यांचाही वाढदिवस आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, सनीने त्याच्या वडिलांच्या उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. ते 15-20 दिवस किंवा उपचार होईपर्यंत अमेरिकेत राहतील." परंतु या बातमीत कोणतंही तथ्य नाही असं समजतंय.

Advertisement

Advertisement