बीड-आष्टी आणि सोलापूर जिल्ह्यात सहा जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाच्या शार्प शुटरला शुक्रवारी (दि.१८) यश आले आहे. करमाळा तालुक्यातील वांगीमध्ये या बिबट्याचा अंत करण्यात आला असून त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आष्टी तालुक्यातील तिघांना शिकार केल्यानंतर बिबट्याने करमाळा तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता.या बिबट्याने त्या परिसरात धुमाकूळ घालत तीन ते चार जणांची शिकार केली होती.राज्यभरातील वन विभागाची पथके बिबट्याला ठार मारण्यासाठी करमाळा परिसरात मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून तळ ठोकून होती.अखेर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वन विभागाच्या पथकाला या बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे.
खाली क्लिक करून पाहा बिबट्याला ठार मारल्याचा व्हिडिओ
बातमी शेअर करा