Advertisement

शिक्षकाची मोबाईलवर स्टेट्स ठेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 06/09/2023
बातमी शेअर करा

बीड - तालुक्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथील खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने मोबाईलला स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.६) रोजी सकाळी घडली.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अंथरवणपिंप्री येथील खाजगी संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अंकुश पवार (वय-33) यांनी आज सकाळी आपल्या मोबाईलला स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील शिक्षकाचे स्टेटस घरच्या मंडळी पाहिल्यानंतर माळरानानजीक पळाले मात्र तोपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. तात्काळ त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योती मालवली होती. 

Advertisement

Advertisement