Advertisement

बीडच्या तहसीलदारपदाची सूत्रे पुन्हा हजारेंकडे

प्रजापत्र | Tuesday, 05/09/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ५ (प्रतिनिधी ) : मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या बीडच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कारभार पुन्हा एकदा केज येथील नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या सुरेंद्र डोके यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार होता. आता सुहास हजारे बीडचे तहसीलदार म्हणून काम पाहणार आहेत.

 

बीड तहसीलमध्ये सुहास हजारे यांनी एक वर्षापेक्षा अधिक काळ तहसीलदार म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळला होता. याकाळात त्यांनी अनेक बाबतीत नेत्रदीपक कामगिरी केली. मात्र दिड महिन्यापूर्वी या पदाचा अतिरिक्त कारभार बीड तहसीलमधील नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रशासकीय आदेशात सुधारणा करून पुन्हा एकदा सुहास हजारे यांच्याकडे बीड तहसीलची जबाबदारी दिली आहे. 

 

Advertisement

Advertisement