Advertisement

चक्काजाम आंदोलनाच्या तारखेत बदल

प्रजापत्र | Tuesday, 05/09/2023
बातमी शेअर करा

बीड - मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (ता.आंबड) येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने (दि.६) सप्टेंबर रोजी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत (दि.४) सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता परंतु (दि.६) रोजी जिह्यात तलाठी भरतीची परीक्षा असल्याने (दि.६) रोजी जिल्ह्यात होणारे चक्काजाम आंदोलन (दि.७) रोजी करण्यात येणार आहे. याची नोंद बीड जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी घ्यावी. 

(मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा) 

 

 

Advertisement

Advertisement