जालना - खासदार उदयनराजे हे जालन्यातील आंतरवाली सराटा गावात आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून त्यांनी आंदोलनाबाबत माहिती जाणून घेतली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जालन्यातील आंदोलनात पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या ग्रामस्थांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
बातमी शेअर करा