बीड-शहरातील जिजामाता चौकातील एका प्ल्यायवुडच्या गोडाऊनमध्ये केमिकल कॅनचा भीषण स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.या भीषण घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.
अनिरुद्ध संजयराव पांचाळ (वय-३०) यांचा या स्फोटात जागीच मृत्यु झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.बीड शहरातील चंपावती प्ल्यायवुडच्या गोडाऊनमध्ये केमिकल कॅनचा अचानक भीषण स्फोट झाला.यात अनिरुद्ध पांचाळ यांचा जागीच मृत्यु झाला असून स्फोटच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता.दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस आणि श्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
बातमी शेअर करा