जम्मू-काश्मीर पोलिसांनी आसाम रायफल्स आणि सीआरपीएफच्या मदतीने बांदीपोरा जिल्ह्यात एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका महिलेसह दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर एके-47सह अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, आरोपींपैकी एक पाकिस्तानस्थित हँडलर मुश्ताक अहमद मीरच्या संपर्कात होता. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला 47 लाख रुपयेही मिळाले होते. अहमद मीर 1999 मध्ये पाकिस्तानला गेला होता.
आरोपी हा शस्त्रांची डिलिव्हरी घेऊन जाणार होता
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 25 ऑगस्टला एका हायब्रीड दहशतवाद्याची माहिती मिळाली होती. यानंतर परिसरात चौकी करण्यात आली. या चौकीतून एका व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. या व्यक्तीकडून एक पिस्तूल, एक पिस्तुल मॅगझिन, 8 राउंड आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. शफायत जुबेर असे आरोपीचे नाव आहे.
दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी 47 लाख मिळाले
बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुबेरला ४७ लाख रुपये मिळाले होते. 2000 मध्ये कोठीबाग आयईडी स्फोटातही जुबेरचा हात होता. या स्फोटात 12 पोलिसांसह 14 जणांचा मृत्यू झाला होता. 2009 मध्ये लष्कराचे वाहन जाळल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्याच्या पत्नीकडून शस्त्रे जप्त
झुबेरने चौकशीदरम्यान सांगितले की तो मुनिरा बेगम नावाच्या महिलेकडे शस्त्रे घेण्यासाठी जात होता. मुनिरा बेगम ही ठार झालेल्या दहशतवादी युसूफ चौपानची पत्नी आहे. त्यानंतर पोलिसांनी मुनिराकडून 1 एके-47 रायफल, 3 मॅगझिन, 90 गोळ्या आणि एक पेन पिस्तूल जप्त केले. चौकशीदरम्यान मुनिरा दोन वेळा पाकिस्तानात गेल्याचे समोर आले.