इस्त्रोची चांद्रयान 3 मोहीम ही यशस्वी झाली. भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश झाला आहे. आता लवकरच इस्रोचे हे यश मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी मिशन मंगलचे दिग्दर्शक जगन शक्ती हे तयार आहेत.
जगन शक्ती हे हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी जगन सज्ज आहेत. वृत्तानुसार शक्ती यांनी मिशन मंगलच्या टीमसोबत हा चित्रपट बनवणार असल्याची पुष्टी केली आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना जगन शक्ती यांनी सांगितले की, "आम्ही ही संधी जाऊ देणार नाही. मी आता या विषयावर थोडा विचार करतोय. यासाठी माझ्या मोठ्या बहिणीकडून काही माहिती घेत आहे. माझी बहीण इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे."
पुढे ते म्हणाले की, चांद्रयान 3 वर बनवल्या जाणार्या चित्रपटात मिशन मंगलमध्ये काम करणाऱ्या टीमलाच घ्यायचे आहे. मात्र या सिनेमात अक्षय कुमार असेल का याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही. असं असलं तरी त्यांनी अद्याप याबाबत अधिकृत काहीही माहिती शेयर केलेली नाही.
त्यांनी सांगितले की, या मोहिमेच्या यशानंतर लगेचच त्यांनी चित्रपट बनविण्याचा विचार सुरू केला आहे. मिशन मंगल बनवण्याचे काम सुरू झाले तेव्हा देखील त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेतली होती. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत होता आणि विद्या बालनसह इतर अभिनेत्री देखील चित्रपटात दिसल्या होत्या.
2019 मध्ये आलेल्या मिशन मंगलमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नीती मेनन आणि शर्मन जोशी यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्याने जगभरात सुमारे 290 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मागील चित्रपटाचा अनुभव किंवा चांद्रयान 3 ची क्रेझ मात्र जगन शक्ती यांना ही संधी सोडायची नाही आहे.