मुंबई - शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिर्डीत ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारीच त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती आहे.
बातमी शेअर करा