नेकनूर-बीड तालुक्यातील धावड्याचीवाडी येथे एका महिलेचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२१) सकाळी समोर आली.चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा काटा काढल्याच्या चर्चा असून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
मंगल गुंडीराम भोसले (वय-४५) असे मयत महिलेचे नाव आहे.तिचा पती गुंडीराम भोसलेने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीने संपविल्याच्या चर्चा परिसरात सुरु आहेत.नेकनूर पोलीस याप्रकरणाचा तपास करीत असून घटनास्थळी पंकज कुमावत यांनी भेट दिली होती.दरम्यान आरोपी पती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
पैशावरून व्हायचे वाद
दरम्यान याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार मंगल आणि गुंडीराममध्ये पैशाच्या कारणावरून ही सातत्याने वाद होत असे.सातत्याने होणाऱ्या वादामुळे पतीपत्नीत मोठा दुरावा निर्माण झाला होता.नंतर चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला संपविल्याच्या चर्चा आहेत.अद्याप पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नसून गुंडीरामला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.