मुंबई - सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 15-20 दिवसांत राज्यात काय बदल होईल ते राज्य बघेल. सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये सर्व मंत्री आणि काही देशांचे कॉन्सिलेट जनरल यांना जेवणाचा निमंत्रण दिलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे राज्यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली विरोधकांनी मात्र अजितदादांच्या अनुपस्थितीवरून सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नसल्याच पाहायला मिळत आहे. विजय वडे्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, 15-20 दिवसांत राज्यात काय बदल होईल ते महाराष्ट्र बघेल. बदल होणार आहे पण आमची सत्ता येणार नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल. असा दावाही त्यांनी यावेळी केला.