बीड - कोतवाल भरती प्रक्रिया - २०२३ च्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सर्व तालुक्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्याचा शेवटचा (दि.१८) ऑगस्ट हा नमूद करण्यात आलेला आहे. तसेच कोतवाल भरती प्रक्रियेच्या अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश खुल्या प्रवर्गासाठी रुपये ५००/-व मागास प्रवाहासाठी रुपये ४००/- परीक्षा शुल्क म्हणून सादर करणेबाबत जाहिरातीद्वारे कळविण्यात आलेले आहे. तथापि, बँकेच्या कार्यालयीन कामकाजांचे दिवस व या महिन्यात आलेल्या शासकीय सुट्या यामुळे उमेदवारांना डीडी (धनाकर्ष)काढण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने अर्ज दाखल करण्याची मुदत (दि.२३) ऑगस्ट पर्यंत वाढण्यात येत आहे. (दि.१९) व (दि.२१) व (दि.२२) या दिवशी अर्ज संबंधित तहसील कार्यालय स्वीकारण्यात येतील.
त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याच्या तारखेत झालेल्या बदलामुळे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी (दि.२२) ऐवजी (दि.२४) रोजी संबंधित तहसील कार्यालयाचे तसेच संबंधित विभागीय अधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://beed.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकादवारे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.