ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12 वाजल्यापासून या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. आता सोमवारी पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बातमी शेअर करा