Advertisement

शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक?

प्रजापत्र | Saturday, 12/08/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एका उद्योजकाच्या घरी हे दोघे एकमेकांना भेटले. यावेळी या दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण ही चर्चा राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणावर फिरती होती, असा दावा केला जात आहे.

 

उद्योगपती चोरडिया यांच्या घरी भेट

यासंबंधीच्या वृत्तानुसार, उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद व अजित पवार यांची बैठक झाली. बैठकीनंतर शरद पवार हे चोरडियांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडला. या घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement