माजलगाव – तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथील गोदावरी नदीत स्नानासाठी गेलेला भक्त नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना आज घडली आहे. यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे दाखल झाले असून बुडालेल्या व्यक्तीचा शोध कार्य चालू आहे.
मारुती खवले (वय-४५) रा.पाटोदा ता.परतुर जि.जालना हे शुक्रवार रोजी आपल्या नातेवाईका सोबत पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते या त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली आहे ही घटना शुक्रवार रोजी सकाळी नऊच्या दरम्यान घडली आहे बुडालेल्या व्यक्तीचा स्थानिक लोक शोध घेत असून यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व तहसीलदार वर्षा मनाळे घटनास्थळी दाखल झाले आहेत शोध कार्य चालू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.