Advertisement

सीमा हैदर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार?

प्रजापत्र | Thursday, 03/08/2023
बातमी शेअर करा

भारतातल्या सचिन मीणावरच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत  दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सीमा हैदर लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार असून एक चित्रपटही तीने साईन केल्याची चर्चा आहे. याशिवाय गुजरातमधल्या एका बड्या उद्योगपतीने सीमा आणि सचिनला वार्षिक सहा लाखांच्या पगाराची नोकरी ऑफर केली आहे. हे कमी की काय आता सीमा हैदर चक्क 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एका राष्ट्रीय पक्षाने सीमा हैदरला आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लवकरच सीमा हैदरचा राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

एनडीएत मित्र पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सीम हैदरला पक्षप्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा हैदरने RPI चं निमंत्रण स्विकारलं आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा हैदरला पक्षाच्या महिला विंगचं अध्यक्ष केलं जाणार आहे. तिच्या बिनधास्त आणि थेट बोलण्याच्या पद्धतीमुळे तिला प्रवक्तेपदही दिलं जाण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चिन्हावर सीमाला लोकसभा निवडणुकीत तिकटही दिलं जाणार आहे. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यास आणि तिला भारतीय नागरिकता मिळाल्यास तिचं पक्षात स्वागत आहे, असं मासूम किशोर यांनी सांगितलं. भारताचा नागरिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सीमाच्या आतापर्यंतच्या तपासात तिच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. सुरक्षा यंत्रणांची क्लीन चिट मिळाल्यास सीमाला प्रवक्तेपद देण्यात येईल, कारण ती एक चांगली वक्ता आहे, असंही मासून किशोर यांनी म्हटलंय.

Advertisement

Advertisement