Advertisement

लालू यादवांना दणका!

प्रजापत्र | Monday, 31/07/2023
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. 'लँड फॉर जॉब' प्रकरणात लालूंचे हात काळे असल्याचे उघड झाले असून त्यांची आणि कुटुंबीयांची ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

जॉबसाठी जमीन प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने सोमवारी लालू कुटुंबाची ६ कोटींची मालमत्ता जप्त केली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कथित 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने याप्रकरणी लालू कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी केली आहे. 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
लालू प्रसाद यादव २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वेमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. त्यांनी विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये केलेल्या नियुक्त्यांशी संबंधित त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचाही तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे. 

Advertisement

Advertisement