बीड - मनोहर भिडे यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी गरळ ओकली होती त्याच्या निषेधार्थ शहरातील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळा परिसरात बीड जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने व समता परिषेदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने मनोहर भिडे याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मनोहर भिडे च्या वक्तव्याने महाराष्ट्रातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रेमींची मने दुखावली आहेत. यामुळे आज शहरातील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळा परिसरात समता परिषद च्या वतीने 'या भिडेच करायच काय, खाली मुंडक वर पाय' असे नारे देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी समता परिषेदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत हे देखील यात सहभागी होते.