पुणे - सहायक पोलिस आयुक्त यांनी आपल्या पत्नी अन् पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजणक घटना पुणे येथील बालेवाडीत घडली. सहायक आयुक्त यांनी स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. भारत गायकवाड हे सहायक आयुक्त यांचे नाव असून ते अमरावतीत कार्यरत होते.
या घटनेत सहायक आयुक्त गायकवाड यांची पत्नी मोनी गायकवाड (वय वर्षे 44) आणि त्यांचा पुतण्या दीपक गायकवाड (वय वर्षे 34) यांचा जगीच मृत्यू झाला. गायकवाड हे अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कर्यरत आहेत.
याबाबद अधिक असे की, शनिवारी सुट्टी असल्याने सहाययक आयुक्त गायकवाड हे पुण्यात आले होते. पुण्यातील बालेवाडी भागात आयुक्त गायकवाड त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहत होते. रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
आयुक्त गायकवाड यांनी गोळ्या झाडत आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी पिस्तूल घेतले होते. त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याचा खून का केला? याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पुण्याच्या चतु:शृंगी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
प्रजापत्र | Monday, 24/07/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा