बीड - हातात तलवार आणि सुरा घेवून फिरणाऱ्या दोघांना शहर ठाण्याचे पो. नि. मुकूद कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडील तलवार आणि सुरा जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील राजुरी वेस भागात हातात तलवार घेवून फिरत असतांना पोलीसांनी शेख हाफीज शेख मुजीब (वय-४८) रा.बुंदेलपुरा,बीड याला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस अंमलदार मनोज परजणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरी कारवाई कटकटपुरा भागात करण्यात आली. याठिकाणी सादखान सुलतानखान (वय-२०) रा. जुनी भाजी मंडई,बीड हा लाकडी मुट असलेला लोखंडी सुरा हातात घेवून फिरत असतांना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणात पो. कॉ. राहुल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून साद खान याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. मुकूंद कुलकर्णी, पीएसआय पवार, गव्हाणे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सिरसाट, सय्यद अश्फाक, मनोज परजणे, राहुल गुंजाळ, सुशेन पवार यांनी केली.