Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा

प्रजापत्र | Tuesday, 04/07/2023
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटी याठिकाणी आज (दि.५) सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बैठकीस बीड जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीस बीड जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार, सर्व वरिष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व सहकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement