Advertisement

नेकनूरमध्ये रोखला बालविवाह..

प्रजापत्र | Friday, 23/06/2023
बातमी शेअर करा

 

नेकनूर - येथील इंदिरा नगर भागात बालविवाह होत असल्याची माहिती नेकनूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, ग्रामसेवक बहिरवाळ यांना  मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ नियोजीत विवाहस्थळी धाव घेत त्या ठिकाणी जावून बालविवाह रोखला. सदरील बालविवाहाची आलेली माहिती अज्ञात व्यक्तीने टोल फ्री (क्रमांक १०९८) वर कॉल करून दिली होती. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने धाव घेत त्या ठिकाणी जावून बालविवाह रोखला. विवाहाची सर्व तयारी झाली होती. मात्र ऐनवेळी अधिकारी पोहचल्याने साखरपुडा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Advertisement

Advertisement