केरळनंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन बराच काळ लोटला आहे, मात्र अद्यापही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. यादमम्यान उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरणीची वेळ उलटून गेल्याने पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. नेमकं राज्यात मान्सून पुन्हा कधी सक्रिय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून २६ जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसासाठी सामान्या नागरिक ते शेतकरी यांनी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सूनच्या प्रवासावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान आता राज्यात मान्सून २६ जून नंतर पुन्हा सक्रिय होईल आणि या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सूनचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे