Advertisement

तुळजाई हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा स्फोट

प्रजापत्र | Saturday, 12/12/2020
बातमी शेअर करा

बीड : शहरातील पालवण चौकातील तुळजाई हॉटेलला शनिवारी रात्री 10.15 च्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर या हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसून रात्री उशीरा शिवाजी नगर पोलीस आणि अग्नीशामक दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. या स्फोटात हॉटेलमधील हजारोंचे नुकसान झाले आहे.
आप्पम क्षीरसागर यांचे पालवण चौकात तुळजाई चहा आणि नाष्ट्याचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री ते हॉटेल बंद करुन घरी गेल्यानंतर रात्री 10.15 च्या सुमारास हॉटेलमध्ये सुरुवातीला छोटी आग लागली. यानंतर ही आग सिलेंडरला लागल्यानंतर हॉटेलमध्ये मोठा स्फोट झाल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले. परिसरातील नागरिकांनी सदरची माहिती तात्काळ अग्निशामक दल आणि शिवाजी नगर पोलीसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशामक दलाचे जवान दाखल झाले होते. रात्री पावणे अकराच्या सुमारास ही आग विझविण्यात आल्याची माहिती असून यामध्ये हजारोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, पत्रे, जळून गेले असून आगीचे नेमके कारण मात्र रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

Advertisement

Advertisement