नेकनूर दि.१८ (वार्ताहर)-जून महिन्यात पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारल्यामुळे,शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.मात्र रविवारी (दि.१८) नेकनूर आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.यावर्षी बीड जिल्ह्यात पावसाचे उशिरा आगमन होत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. सध्या जून सूरू होऊन दोन आठवडे उलटले आहेत. शेतातील मशागतीचे काम उरकून, बी-बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट बघत होता.यंदा पावसाचे वर्तविण्यात आलेले सर्व अंदाज चुकले असून रविवारी नेकनूरमध्ये मात्र पावसाने हजेरी लावली.जोर 'धार' झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागणार असल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा