इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने रविवारी JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर केला. हैदराबाद झोनचा वाविला चिदविलास रेड्डी 360 पैकी 341 गुणांसह अव्वल ठरला आहे.यावर्षी 1 लाख 83 हजार 72 विद्यार्थ्यांपैकी 43 हजार 773 जेईई अॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36,204 मुले आणि 7,509 मुलींचा समावेश आहे.
झोननिहाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
हैदराबाद: 10432 विद्यार्थी
दिल्लीः 9290 विद्यार्थी
मुंबई : 7957 विद्यार्थी
खरगपूर : 4618 विद्यार्थी
कानपूर : 4582 विद्यार्थी
रुरकी : 4499 विद्यार्थी
गुवाहाटी: 2395 विद्यार्थी
असा तपासा निकाल
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर पाहा.
ते डाउनलोड करा आणि सेव्ह करा.
फायनल आन्सर की पेपर 1 ची डायरेक्ट लिंक
फायनल आन्सर की पेपर 2ची डायरेक्ट लिंक