Advertisement

मुक्ताईंच्या पालखीचे बीड शहरात आगमन..

प्रजापत्र | Friday, 16/06/2023
बातमी शेअर करा

बीड दि.१६ (प्रतिनिधि) - आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी दिनांक 2 जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून निघालेला श्री संत मुक्ताबाईचा पालखी सोहळा मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जालना,अंबड, शहापूर, वडीगोद्री, आदी मुक्काम करत टाळ मृदंगाच्या गजरात वाजत गाजत हरिनामाचा जयघोष करत. अखेर हा पालखी सोहळा ढोलताश्यांच्या गजरात आज (दि.१६) रोजी बीड शहरात दाखल झाला आहे. 

माळीवेसच्या हनुमान मंदिरात पालखी मुक्कामी असणार आहे. (दि.१७) रोजी सकाळी अकरा वाजता बालाजी मंदिर नवरंग मित्र मंडळ, दत्तात्रय नलावडे देवा यांच्याकडे मुक्काम व 18 जून उदंड वडगाव, मोरगाव मुक्काम, (दि.१९) जून रोजी सकाळी नऊ वाजता पुढे चौसाळा, पारगाव, कुंथरगिरी, भूम, जवळा, शेंद्री, माढा आष्टी मार्गे अनुक्रमे मुक्काम करत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दरम्यान हा पालखी सोहळा शहरात दाखल झाला असून भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.  

Advertisement

Advertisement