बीड - तालुक्यातील कामखेडा गावातील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे. रघुनाथ इंदुरे असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी कि, रघुनाथ इंदुरे (वय-३५) रा.कामखेडा ता.जि.बीड या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून काल रात्री १० ते ११च्या सुमारास घरी कोणी नसतांना विष प्राशन करून जीवन संपविले आहे. मागील काही दिवसात तो तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, बायको, दोन भाऊ, आई,वडील असा परिवार आहे. या घटनेने कामखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा