माजलगाव दि.१३ (प्रतिनिधी) - आमच्या विरोधात तक्रार का दिली ? या कारणावरून एका गटाने दुसऱ्या गटावर फायटर, दगड-काठ्यांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली.
माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील एका गटाविरूध्द गावातील काही लोकांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती. पाळीववराहांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. सदरील निवेदन का दिले ? या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हल्ल्यात ६ जण गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणा दुपारी स्कॉर्पिओमधून आलेल्या ७ ते ८ जणांनी गावातील अर्जदारांच्या घरावर दगडफेक केली. दगड, काठ्या आणि फायटरने त्या लोकांवर हल्ला केला. त्यामध्ये कृष्णा गणेश शेजुळ (वय २५), सुखदेव सुभाष आडाम (वय २८), आनंद अशोक आडाम (वय ३०), ज्ञानेश्वर आशोक आडाम (वय ३२), गोपाळ गणेश शेजुळ (वय ३५), हरिभाऊ सोमेश्वर शेजुळ (वय ३०) हे ६ जण गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/HANAMARI.jpg?itok=jPB4l_T6)
बातमी शेअर करा