बीड: भारतीय जनता पक्षात सध्या संघटनात्मक बदलाचे वारे जोरात वाहत आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये बदल करणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता पक्षाने भाजपचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना लोकसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी लोकसभा प्रमुख नियुक्त केले आहेत. यात बीडची जबाबदारी विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता बीडचा भाजपचा जिल्हाध्यक्ष बदलणार का? याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
बातमी शेअर करा