Advertisement

दिड किलो वजनाचा गोळा असलेला गर्भाशय यशस्वीरित्या काढला..

प्रजापत्र | Tuesday, 06/06/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - स्त्री रुग्णालय अंबाजोगाई लोखंडी सावरगाव येथे दीड किलो गोळा असलेले गर्भाशय काढण्याची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जिल्हा शल्चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदरील शस्त्रक्रिया स्त्री रोगतज्ञ डॉ.सुनील जाधव, शल्यचिकित्सक डॉ.अरुणा दहिफळे व स्त्रीरोग तज्ञ डॉ.सायमा खान यांनी यशस्वीरित्या केली. महिलेला अनेक दिवसापासून पोटामध्ये गोळ्याचा त्रास होता. तो गोळा शरीरातील इतर अवयवांशी चिटकलेला होता. त्यामुळे महिलेच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. भूलतज्ञ डॉ.वैशाली पोतदार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शस्त्रक्रिया यशस्वी केली.
शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी इन्चार्ज संगीता शिंदे, स्टाफ नर्स मीरा मुंडे, इमरान ब्रदर, कक्षसेवक मुक्तार, खोमणे, निगोळे यांनी परिश्रम घेतले. या पूर्वीही अशाच अनेक गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया आमच्या टीम ने करून रुग्णांचे जीव वाचविले असून स्त्री रुग्णालयातील मिळणार्‍या सुविधांचा नक्कीच गरजू रुग्णांना लाभ होईल.असे डॉ.अरूणा दहिफळे (केंद्रे) यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement