Advertisement

डॉ. गंगाधर मुंडे यांचे निधन

प्रजापत्र | Tuesday, 08/12/2020
बातमी शेअर करा

बीड: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ गंगाधर मुंडे यांचे सोमवारी (दि.७) रात्री १० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ५२ वर्षांचे होते. डॉ.गंगाधर मुंडे यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. नांदूर घाट रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. महानंदा मुंडे यांचे ते पती होते. सोमवारी रुग्ण तपासणी केल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने बीडच्या खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना  औरंगाबाद येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रस्त्यात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. गंगाधर मुंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली ,एक मुलगा, चार भाऊ असा परिवार आहे.

 

Advertisement

Advertisement