बीड - मागच्या दोन दिवसापासून बीड शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोर 'धार' हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारी बीडमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळ्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.मागच्या १५ दिवसांत बीड जिल्ह्यात तीन ते चार वेळा पाऊस पडला असून गारपीठेने देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.त्यात गुरुवार आणि शुक्रवार रोजी पुन्हा जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली आहे.
बातमी शेअर करा