Advertisement

बीडमध्ये ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून

प्रजापत्र | Friday, 07/04/2023
बातमी शेअर करा

बीड - कौटूंबिक वादातुन विवाहितेचा ओढणीने गळा आवळुन खुन झाल्याची घटना (दि.६) रोजी पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर पत्नीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता, मात्र पेठ बीड पोलीसांनी केलेली चौकशी आणि मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला. मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पेठ बीड भागातील तेलगाव नाका येथील मुस्कान हिचा विवाह 15 महिन्यापुर्वी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील शेख शाहेद शेख रूकमोद्दीन ह्याच्यासोबत झाला होता. पात्रुड येथे राहत असतांना नेहमी वाद होत होता. त्यामुळे मुस्कानच्या वडिलांनी तिला बीडमध्ये आणले होते. त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी जावई शेख शाहेद हा देखील बीडमध्ये आला. मुस्कान आणि शाहेद दोघेही पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क येथे रूम करून राहत होते. दि.5 एप्रिल रोजी मुस्का आणि तिच्या पतीमध्ये पात्रुड येथील सामान आणण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दि.6 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता शेख शाहेद याने मुस्कानच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीची तब्येत बिघडली असुन तोंडातून फेस येत असल्याचे सांगितले. मुस्कानच्या वडिलांनी व तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तेथे धाव घेतली असता मुस्कान गळफास लावलेल्या अवस्थेत आढळुन आली. तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मुस्कानच्या दंडावर, पायावर आणि हातावर जखमा आढलल्या असुन तिच्या उजव्या गालाजवळ नख लागल्यासारखे दिसुन आले. यावरून जावाई शेख शाहेद यानेच मुस्कानला ओढणीने गळा आवळुन जिवे मारले व आत्महत्येचा बनाव केला. या प्रकरणात मयत विवाहितेचे वडिल शेख जमील शेख खय्युम (रा.तेलगाव नाका,बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख शाहेद विरूध्द कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Advertisement

Advertisement