Advertisement

घंटा गाडी कर्मचाऱ्यांचे न.प. समोर उपोषण

प्रजापत्र | Friday, 07/04/2023
बातमी शेअर करा

बीड - नगर पालिकेतील गुत्तेदार हमीद चाऊस यांचे टेंडर ७ ते ८ महिन्यापूर्वी बंद पडले आहे, मात्र घंटा गाड्यावरील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अजूनही थकीत आहे. या थकीत वेतनाच्या मागणीसाठी न. प. कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि.७) नगर पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.

बीड नगर पालिकेअंतर्गत घंटा गाड़ी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सातत्याने मागणी करून वेतन देण्यासटाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत कर्मचान्यांनी नगर पालिकेसमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे. महिला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले असून पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र टाळाटाळ केली जात आहे. वेतन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. निवेदनावर जावळे सारंग, धुताडमल शुभम, प्रमोद साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Advertisement

Advertisement