रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. स्पीडबोट चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. मांडवा जेट्टीच्या खांबाला बोट घासली. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
छत्रपती संभाजीराजे आणि उदय सामंत हे सामंत गेट ऑफ इंडियावरुन मांडवा येथे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनाच्या बैठकीसाठी जात होते. मांडवा जेट्टी जवळ पोहचल्यावर बोट जेटीवर लावण्यासाठी वळवली, यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. चालकाने बोटीवर निंयत्रण मिळवून बोट सुखरूप लावली.
या अपघातानंतर पालकमंत्री उदय सामंत हे मांडवा येथे रस्तेमार्गाने गेले. त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे देखील होते.
या अपघातावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की ते मांडवा येथे जात होते. यावेळी सुरवातीला काय घडत आहे, याचा अंदाज आला नाही. मात्र जेव्हा बोट खांबाला जाऊन धडकली तेव्हा काहीतर भयंकर घडत असल्याचा अंदाज आला. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही.