Advertisement

वडवणी तालुक्यातील एकाच गावात आढळले कोरोनाचे ११ रुग्ण

प्रजापत्र | Wednesday, 02/12/2020
बातमी शेअर करा

बीड : शहरी भागातली कोरोना रुग्णांची संख्या जरी घटत चालली असली तरी ग्रामीण भागात मात्र कोरोना ची रुग्ण संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. आज  आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील  निगेटिव्ह ची संख्या ७२२ असून तब्बल ५२ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत.यामध्ये वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का या  गावामध्ये ११ रुग आढळले आहेत. 
                आज  दुपारी आलेल्या अहवालानुसार रुग्ण संख्या पुढील प्रमाणे अंबाजोगाई -८,बीड -१२,धारूर -२,गेवराई -२,केज -४,माजलगाव -३,परळी -९,पाटोदा -१,वडवणी -११ अशी आहे.          

  

Advertisement

Advertisement