Advertisement

सतीश शिंदेंच्या जामीनबाबत न्यायालयाने काय दिला निर्णय?

प्रजापत्र | Saturday, 01/04/2023
बातमी शेअर करा

बीड - आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या दूध भेसळ प्रकरणातील गुन्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या सतीश शिंदे यांना बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्याशी संबंधित दूध संघात भेसळ होत असल्याचे पोलिसांच्या छापेमारीत समोर आले होते. या प्रकरणात अन्न औषध प्रशासनाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीसांनी सतीश शिंदे आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सतीश शिंदे यांनी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर बीडचे जिल्हा सत्र न्यायाधिश आर.एस. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सतीश शिंदे यांच्याकडून केला गेलेला यूक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Advertisement

Advertisement