Advertisement

गर्दीचा फायदा घेत चोरट्याने व्यापाऱ्याच्या खिशातील रोख रक्कम लांबविली

प्रजापत्र | Saturday, 25/03/2023
बातमी शेअर करा

बीड - बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने व्यापार्‍याच्या खिश्यातून ५०९०० रुपये लांबविल्याची घटना काल सकाळी 9 वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजेश अनंत नाईवाडे (वय 33 वर्षे, रा.सुलतानपुर, ता.जि. बीड) हे व्यापारी गावी जाण्यासाठी बीड बसस्थानकात काल (दि. 24) रोजी सकाळी 9 वाजता आले होते. ते बसमध्ये चढत असतांना मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने राजेश नाईवाडे यांचा खिशातील रक्कम लांबविल्याची घटना घडली. त्यांच्या खिश्यात तब्बल ५०९०० रुपये इतकी रक्कम होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement