Advertisement

बीडमध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन

प्रजापत्र | Saturday, 25/03/2023
बातमी शेअर करा

बीड - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ बीड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज शनिवार (दि.२५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अब्रुनुकसानीच्या एका प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या करणारा असून अन्याय करणारा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. गांधीवरील कारवाईच्या निषेधार्थ बीड काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

Advertisement

Advertisement