बीड - बचत गटाकडुन कर्ज दिल्यानंतर त्याचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय इसमावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गांधी नगर परिसरातील नुर कॉलनी येथे घडली.
शहरातील गांधी नगर भागातील शेख शाकेर असावोद्दीन (वय ३५) हे काल रात्री समोरच्या व्यक्तीकडे बचत गट कर्जाचा हप्ता मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी ३ ते ४ जणांनी त्यांना शस्त्राने मारहाण केली असुन त्यांच्या पत्नी शेख समरीन फातेमा यांनाही मारहाण केली आहे. यामध्ये दोघेही जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातमी शेअर करा