मागील आठ दिवसांपासूस घसरणीसह बंद होणाऱ्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. गुंतवूकदारांकडून आज खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला. आज, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 448.96 अंकांच्या तेजीसह 59,411.08 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 146.90 अंकांच्या तेजीसह 17,450.90 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 2396 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1009 कंपन्यांचे शेअर दर घसरले. दिवसाखेर 129 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 45 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सेनसेक्स निर्देशांकातील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर दर वधारले.
मेटल इंडेक्स जवळपास 4 टक्क्यांनी वधारला. बँक, आयटी, रियल्टी इंडेक्स हे 1 टक्क्यांनी वधारले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), अॅक्सिस बँक , इंडलसंइड बँक, टेक महिंद्रा, टीसीएस , एचसीएल टेक , टाटा स्टील, मारुती , टाटा मोटर्स या कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, पॉवरग्रीड , एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.