बीड - एका घरातील शौचालयाचे सेफ्टी टँक साफ करत असतांना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील इमामपुर रोडवर आज दुपारी घडली. या घटनेत अन्य दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड शहरातील इमामपुर रोडवर एका घरातील शौचालयाचे सेफ्टी टँक दोन दिवसांपुर्वी उपसण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी सेफ्टी टँक साफ करण्यासाठी त्यामध्ये अविनाश आसाराम हातागळे (वय 25) हे उतरले होते तर अनिल रामदास अंकुशे आणि रामदास दादाराव अंकुशे (सर्व रा.प्रकाश आंबेडकर नगर, बीड) हे टँकच्यावर उभे होते. सफाई करत असतांना अविनाश हातागळे यास अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. ते पाहुण अनिल अंकुशे आणि रामदास अंकुशे हे दोघेही टँकमध्ये त्याला बाहेर काढण्यासाठी उतरले असता ते देखील घसरून पडले. या दुर्देवी घटनेत अविनाश हातागळे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल अंकुश आणि रामदास अंकुश हे जखमी झाले आहेत.
बातमी शेअर करा