Advertisement

घरात घुसून दिव्यांग मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Friday, 24/02/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२४ (प्रतिनिधी)-एका दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला २५ वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजारांचा दंड अंबाजोगाईच्या अप्पर सत्र न्यायाधीश संजश्री. जे. घरत यांनी सुनावलं आहे.पवन उकंडे असे आरोपीचे नाव असून या प्रकरणात मान्यायालयाने सरकार पक्षाचा साक्षीपुरावा व सरकारी वकील अॅड. रामेश्वर मन्मथ देले यांचा युक्तीवाद ग्राहय धरत ही शिक्षा सुनावली. 
    पीडितेने परळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिचे आई-वडील शेतात गेल्यानंतर तिच्या घरा शेजारी राहणाऱ्या पवन विश्वनाथ उखड़े याने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पीडिता घरात एकटी असताना तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला.यावेळी पीडिता आरडाओरड करू लागल्यानंतर घराशेजारील सटवा सोनाजी गव्हाणे हे तिच्या मदतीसाठी आले तोपर्यंत आरोपीने पळ काढला.याप्रकरणात परळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ३७६ (२) (फ) (एल), ३५४,३५२ भा.द.वि.सह कलम ९२ अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर अंबाजोगाई न्यायालयात 
दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यानुसार सरकार पक्षतर्फे सदर प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा.न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस दोषी धरून २५ वर्ष सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच या प्रकरण मध्ये अॅड विलास लोखंडे यांनी अथक परिश्रम करून फिर्यादी व तिचे कुटुंब यांचे सर्वार्थाने मदत व पुनर्वसन केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांनी काम पाहीले व त्यांना अॅड अशोक व्ही. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन केले व त्यांना अँड विलास लोखंडे व अॅड. नितीन पूजदेकर यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणात पोलीस पैरवी अधिकारी पी.एस.आय. जमादार व पोलीस पैरवी पो. कॉ. गोविंद कदम, पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे.कॉ. अविनाश गित्ते यांनी काम पहिले.  

Advertisement

Advertisement