औरंगाबाबाद : दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर सुरु असल्याने महाराष्ट्राने सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. दिल्लीवरुन औरंगाबादेत येणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सचखंड एक्सप्रेसने दिल्लीतील अनेक प्रवाशी औरंगाबादमध्ये येतात. दिल्लीमधून आलेल्या प्रवाश्यांमुळेऔरंगाबाद शहरात कोरोना वाढू शकतो, ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवरच प्रवाश्यांच्या कोरोना चाचण्या होणार आहे. तसंच संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तातडीने क्वारन्टाईन केलं जाणार आहे.
राजधानी नवी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत रोज चार ते पाच हजार कोरोना केसेस समोर येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 879 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 111 रुग्ण कोरोनाने मृत्यू पावले आहेत. दिल्लीतील हीच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सचखंड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
प्रजापत्र | Sunday, 22/11/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा