नेकनूर-सोलापूरवरून औरंगाबादकडे जात असताना रौळसगाव शिवारात ट्रक चालक लघुशंकेसाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्या चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रात्री ११ च्या सुमारास घडली.घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी चौसाळा आरोग्य केंद्रात आज सकाळी पाठविण्यात आला.
राजेशकुमार शर्मा (वय-४४ रा.लुधियाना,पंजाब) हे आपला ट्रक (एम.एच.१५ सीएसके.८०६५) घेऊन औरंगाबादकडे जात असताना रौळसगाव शिवारात ते लघुशंकेसाठी थांबले.यावेळी रस्ता ओलांडून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जागीच गतप्राण झाले. हा अपघात एवढा भीषण होता की यात शर्मा यांच्या शरीराचे तुकडे होऊन ते रोडवर पसरले होते.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी नेकनूरचे सपोनि लक्ष्मण केंद्रे,श्री.शेंगडे यांनी भेट दिली.याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बातमी शेअर करा