Advertisement

‘ती’ला भोवला बाळाचा हट्ट,प्रेयसी जळीत प्रकरण

प्रजापत्र | Friday, 20/11/2020
बातमी शेअर करा

अशोक शिंदे

नेकनूर : ऐन दिवाळीच्या दिवशी प्रियकराने प्रेयसीला अ‍ॅसीड टाकून जाळल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती हाती येत असून पिडीतेने बाळाचा हट्ट केल्याने तिच्या प्रियकराने तिला जाळून मारल्याचे समोर आले आहे. 
                      ऐन दिवाळीच्या दिवशी येथील येळंबघाट जवळ एका तरुणीला अ‍ॅसिड टाकून अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडण्यात आले होते. पोलीस तपासात हा प्रकार तिचा प्रियकर असलेल्या अविनाश राजुरे यानेच केल्याचे समोर आले. अविनाश आणि सदर तरुणी सहा वर्षांपासून एकमेकावर प्रेम करत होते. मात्र सदर तरुणीचा विवाह दुसर्‍या व्यक्तीसोबत झाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी सदर तरुणीने घर सोडले आणि ती अविनाश सोबत राहू लागली होती. अविनाश आणि सदर तरुणी पुणे येथे ‘लिव्हइन’ मध्ये रहात होते. मात्र मागच्या काही काळात सदर तरुणी सातत्याने आपल्याला मुल पाहिजे असा हट्ट करीत होती. मात्र अविनाशची मुल होऊ देण्याची इच्छा नव्हती. त्यातूनच दिवाळीला मोटार सायकलवर गावाकडे जायचे आहे असे सांगून अविनाशने तिला सोबत घेतले आणि येळंबघाट नजीक तिच्यावर अ‍ॅसीड टाकून तिला पेटवून दिले यातच तिचा मृत्यु झाला. स्वत: अविनाशने पोलीस तपासादरम्यान ही माहिती दिल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी वेगाने चक्रे फिरवत 24 तासात आरोपीला अटक केल्याने या प्रकरणाचा छडा लागला आहे. 

 

Advertisement

Advertisement